राम राम!
आपण कधी विचार केला आहे का , की आपण "राम-राम" दोन वेळेस का म्हणतो.कारण~~~~~|-
र = २७ वा शब्द. ( क ख ग घ ड..........)
आ = २ रा शब्द. (अ आ..)
म = २५ वा शब्द शब्द.(अ आ............)
एकूण = ५४.
राम + राम.
५४+५४ = १०८.
आपण जी गळ्यात माळ घालता तिचे मणि सुद्धा १०८ असतात.
ह्याचा अर्थ = आपण एका व्यक्तीला जर दोनदा "राम-राम" म्हटले तर आपण एक माळ जप केला असा होतो.....तर मग म्हणा की मंडळी ....
राम राम ....
🙏🙏🙏🙏
~~~~🙏🙏~~~~
रामनाम घेत असतांना लक्ष नामावर स्थिर झाले की मन लक्ष+मन= *लक्ष्मण* होते
नामस्मरण करताकरता मन उन्मन होते म्हणजेच *हनुमान* होते.
हनुमान झालेले हे मन भक्तीमध्ये रत झाले की *भरत* होते.
असे मन सततच्या नामस्मरणामुळे तृप्त होते, त्यातील विकार नाहीसे होतात ,शत्रुंचे हे मन हनन करते म्हणून ते *शत्रुघ्न* होते.
अशा नामस्मरणाने मन शांत होते शीतलता प्राप्त करते म्हणजेच *सीता* होते.
सीता झालेल्या या मनात दुसरा कोणाचा विचार येऊ न शकल्याने ते *राम* स्वरूप होते.
🚩🙏🙏🏻 🚩
रामरक्षेच्या एका श्लोकाबद्दल- कदाचित माहिती असेलही सगळ्यांना....
रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे ।
रामेणाभिहतो निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासो$सम्यहम् ।
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।।
या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत. रामो=रामः(प्रथमा) रामं(द्वितीया), रामेण(तृतीया), रामाय(चतुर्थी), रामान्नास्ति=रामात् (पंचमी)रामस्य(षष्ठी), रामे(सप्तमी),भो राम(संबोधन).
ह्या श्लोकात रकाराची पुनरावृत्ती असल्याने गर्भारपणात हा श्लोक म्हणल्याने जन्माला येणारे बाळ बोबडे (किंवा जीभ जड असलेले) होत नाही.
: रामरक्षा: आरोग्यरक्षक कवच!!!
एक वेगळा पैलू तुमच्यासमोर मांडत आहे. श्रीरामरक्षा स्तोत्र हे आजही कित्येक घरांमध्ये तिन्हीसांजेला आवर्जून म्हटले जाते. आजारी व्यक्ती वा शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला रामरक्षा ऐकवली जाते. रामरक्षाच का? असे काय रहस्य या मंत्रात दडले आहे?
रामनामकवच:
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥४॥
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥५॥
जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।
स्कंधौ दिव्यायुधः पातुभुजौ भग्नेशकार्मुकः ॥६॥
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् ।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥७॥
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।
उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥८॥
जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।
पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥९॥
असे कवच या स्तोत्रात आलेले आहे. कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्यासाठी मंत्र धारण करणे!! थोडक्यात; आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणे. या कवचाची फलश्रुती मनीट पहा....
पातालभूतलव्योम चारिणश्छद्मचारिणः ।
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥ ११ ॥
म्हणजे, पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे, छद्मचारिणः म्हणजे खोटे सोंग घेणारे असे (राक्षस) रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे नजर वर उचलून पण पाहू शकत नाहीत!!
आता, थोडं थांबा....'छद्मचारिणः' हा शब्द पुन्हा वाचा. काही आठवलं? विज्ञान शिकत असताना 'pseudopodium' हा शब्द आपण शिकलेला असतो. अमिबासारखे जीव हे pseudopodium म्हणजे छद्मपाद म्हणून ओळखले जातात!! थोडक्यात; इथे 'राक्षस' हे अलिफ-लैला सारखे शिंगं वगैरे असलेले राक्षस नसून सूक्ष्मजीव आहेत. आयुर्वेदात विशेषतः सुश्रुत संहितेत कृमी, राक्षस असे शब्द अनेक ठिकाणी सूक्ष्मजीवांसाठी वापरण्यात आलेले आहेत.
आजवर वैद्यकीय उपचार करत असताना; अनेक वेळेला रामरक्षेचा लाभ झालेला मी पाहिला-अनुभवला आहे. यामागील कारण शोधता-शोधता ही गोष्ट हाती लागली. आजच्या मुहूर्तावरच ती लिहावीशी वाटली ही त्या रामचंद्राचीच कृपा. आपलेही असे काही अनुभव असतील तर जरूर सांगा.
जय श्रीराम!!
Comments
Post a Comment